14 May 2024 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Loksabha Election 2024 | फक्त मुंबई काँग्रेस नव्हे! संपूर्ण CWC मध्ये बदल, निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या परिवर्तनाची तयारी

Loksabha Election 2023

Loksabha Election 2024 | काँग्रेस परिवर्तनासाठी तयार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सर्वोच्च समिती काँग्रेस वर्किंग कमिटी म्हणजेच सीडब्ल्यूसी बदलून अनेक प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशऐवजी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याच वृत्त आहे. 2023 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आणि पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका होणार आहेत.

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरू असल्याचे बातमी समोर आली आहे. तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि झारखंडला लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत. याशिवाय गुजरात, ओडिशा, पुद्दुचेरी, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि झारखंडमध्येही पक्ष प्रभारी बदलले जाणार आहेत.

राजस्थानमध्ये पूर्ण मेकओव्हर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये लवकरच काँग्रेसची नवी समिती स्थापन केली जाऊ शकते. राज्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. पायलट लवकरच आपल्या नव्या पक्षाची घोषणा करतील अशी अटकळ बांधली जात आहे, पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते याचा इन्कार करत आहेत.

नवीन सीडब्ल्यूसी

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवड झाल्यापासून काँग्रेसमध्ये सीडब्ल्यूसीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता या समितीबाबत पक्ष लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. काही आठवड्यांत सीडब्ल्यूसी बदलाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर प्रियांका गांधी यांना ही मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत पक्ष आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही त्या जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत.

मध्य प्रदेश पासून सुरुवात

प्रियांका गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात मध्य प्रदेशापासून करू शकतात. त्या 12 जून रोजी जबलपुर दौऱ्यावर आहेत. सध्या प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे बदल केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशसहित संपूर्ण हिंदी भाषिक पट्ट्याला काँग्रेसने गांभीर्याने घेतले आहे.

News Title : Loksabha Election 2024 Congress CWC major changes check details on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2023(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x