27 April 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लातूरमध्ये दुष्काळामुळे गावकऱ्यांवर शरिराला हानिकारक पाणी पिण्याची वेळ

Devendra Fadanvis, Udhav Thackeray

लातूर : मराठवाड्यात दुष्काळाने अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्यात लातूरमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचं वृत्त आहे. पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांमध्ये तुटवडा जाणवत असल्याने अनेक गावातील महिलांची वणवण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शरीराला अपायकारक असलं तरी ते अशुद्ध पाणी पिण्याची वेळ अनेकांवर आल्याचे समजते.

त्यात सरकारी टँकर १५ दिवसातून केवळ गावात येत आहेत. परिणामी प्रति घरामागे केवळ २५० लिटर इतकाच पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे लोकांवर वेगळं पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. आधीच कमी झालेला पावसामुळे शेती करणं देखील अवघड होऊन बसलं आहे आणि त्यात या भागात दुसरा उपजीविकेचा म्हणजे रोजगाराचा आसरा नसल्याने सामान्य जनता अत्यंत हलाकीच्या अवस्थेत आयुष्य जगत असल्याचं सहज नजरेस पडत आहे.

त्यामुळे या दुष्काळाची दाहकता विचारात घेतल्यास सरकारने युद्धपातळीवर मदत कार्य हाती घेणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाला सुद्धा कामी लागण्याची गरज असल्याच गावकरी सांगत आहेत, अन्यथा आम्हाला काही दिवसांसाठी गाव सोडण्यावाचून दुसरा पर्याय उरणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x