24 May 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट जाणून घ्या
x

काँग्रेस पक्ष दिल्ली अध्यादेशावरील विधेयकाला संसदेत विरोध करणार, आप कडून स्वागत, आता विरोधकांच्या बैठकीकडे लक्ष

Centre Ordinance Vs Aam Aadmi Party

Centre Ordinance Vs Aam Aadmi Party | दिल्लीतील सेवांच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या अध्यादेशाला पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले. देशातील संघराज्य संपवण्याच्या मोदी सरकारच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यपालांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या केंद्राच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करू, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे आम आदमी पक्ष सुखावला आहे. त्यांनी ही सकारात्मक गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

विरोधकांच्या बैठकीत सहभागी होण्याचा आम आदमी पक्षाचा मार्ग मोकळा
यासंदर्भात, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, दिल्ली अध्यादेशावरील विधेयक संसदेत आल्यावर त्याला विरोध करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या संघराज्य संपवण्याच्या प्रयत्नांना आमचा सातत्याने विरोध आहे. राज्यपालांच्या माध्यमातून विरोधी पक्षशासित राज्ये चालवण्याच्या केंद्र सरकारच्या वृत्तीला आम्ही सातत्याने विरोध करत आलो आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की आम्ही दिल्ली अध्यादेशाचे समर्थन करणार नाही. त्यामुळे सोमवारपासून बेंगळुरू येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या विरोधी बैठकीत सहभागी होण्याचा आम आदमी पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिल्ली अध्यादेशाबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी मागणी आम आदमी पक्षाकडून केली जात आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी काँग्रेसने अध्यादेशाला स्पष्ट विरोध करण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी ट्विट केले की, “काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाला स्पष्ट विरोध जाहीर केला आहे. हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे.

आता बेंगळुरूमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला आम आदमी पार्टी हजेरी लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आशा व्यक्त केली की, ‘आप’ आता बेंगळुरूयेथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहील. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

News Title : Centre Ordinance Vs Aam Aadmi Party now congress stand confirmed check details on 16 July 2023.

हॅशटॅग्स

#Centre Ordinance Vs Aam Aadmi Party(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x