10 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्ससाठी नवीन टार्गेट प्राईस जाहीर, अचानक शेअर्स खरेदी वाढली

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. अशा काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी 2023 या वर्षात फारशी खास कामगिरी केलेली नाही.

सध्या टाटा स्टील स्टॉक 119 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक आणखी खाली येऊ शकतो. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 119.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणूकीवर परतावा :

टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये 2023 या वर्षात 0.38 टक्के घट पाहायला मिळाली आहे. याच कालावधीत बीएसई मेटल निर्देशांकामध्ये 3.71 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक फक्त 10.67 टक्के वाढला होता. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 194 टक्के वाढली होती. 19 जानेवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 124.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 सप्टेंबर 2022 रोजी रहा स्टॉक 95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

स्टॉकबाबत तज्ज्ञांचे मत :

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 133 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. कच्च्या मालाच्या किमती स्थिर राहिल्यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील स्टॉकवर प्रति शेअर 133 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मजबूत देशांतर्गत मागणी आणि कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे टाटा स्टील स्टॉकमध्ये वाढ अपेक्षित आहे, असे तज्ञ म्हणतात.

भारतामध्ये टाटा स्टील कंपनीने 6 MTPA पेलेट प्लांट सुरू केले आहे. आणि 2.2 MTPA CRM सुविधा देखील सुरू केली आहे. CRM नेदरलँड्समध्ये असे काही अपग्रेड केले आहेत, ज्यामुळे कंपनीचे उत्पादन मिश्रण पोर्टफोलिओ आणि कमाई अनेक पटींनी वाढणार आहे. टाटा स्टील कंपनीने 600 दशलक्ष टन लोह खनिजाचा साठा निर्माण केला आहे. जून 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 93 टक्क्यांच्या घसरणीसह 524.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या खर्चात अनेक पट वाढ झाल्याने कंपनीच्या नफ्यात घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 7714 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x