18 May 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

मध्य प्रदेशात भाजपला रामराम ठोकण्याचा सपाटा, दिग्गज नेत्याचं 1200 गाड्यांमधून पदाधिकाऱ्यांसहित शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसमध्ये प्रवेश

Samandar Patel

Madhya Pradesh BJP | 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करून कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडणारे मध्य प्रदेशचे आमदार समंदर पटेल यांना सत्ताधारी भाजप पक्षात येऊन चूक झाल्याचं वाटू लागलं. त्यानंतर आमदार समंदर पटेल यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये पुनरागमन केले आहे.

भाजप कार्यालयात राजीनामा सादर करण्यासाठी पटेल यांनी आपला मतदारसंघ जवाद येथून भोपाळला जाताना त्यांच्यासोबत तब्बल १२०० गाड्यांच्या ताफा होता. पटेल हे सिंधिया यांचे तिसरे निष्ठावंत जातात, जे पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत आणि तेही त्याच शैलीत – शक्ती प्रदर्शना करून. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगला काळ नसल्याची चर्चा सुरु असताना भाजपमध्ये मोठे नेत्यांचा पक्ष सोडण्याचा सपाटा लागला आहे.

तत्पूर्वी, १४ जून रोजी शिवपुरीचे भाजप नेते बैजनाथ सिंह यादव यांनी सिंधिया यांच्याशी संबंध तोडून ७०० कार रॅलीचे आयोजन करत काँग्रेस प्रवेश केला होता. भाजपचे माजी शिवपुरी जिल्हा उपाध्यक्ष राकेशकुमार गुप्ता यांनीही २६ जून रोजी कार रॅलीचे आयोजन करून काँग्रेस प्रवेश केला होता. मी महाराजांसोबत (सिंधिया) पक्ष सोडला. पण लवकरच मला भाजपमध्ये गुदमरल्यासारखं वाटू लागलं. मला कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येतं नाही. मला सन्मान आणि शक्तिशाली पद देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये पुन्हा परतलो आहोत असं त्यांनी म्हटलं.

पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला

पटेल यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी पक्षाशी संबंध तोडले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि स्वबळावर ३५ हजार मते मिळवून काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मार्च 2020 मध्ये सिंधिया यांनी 22 आमदारांच्या गटासह पुन्हा पक्ष सोडला आणि भाजपमध्ये मंत्रिपद मिळवलं होतं.

पटेल मोठे नेते, भाजपाला मोठा फटका बसणार

सिंधिया यांना नुकतेच मध्य प्रदेश भाजपच्या अंतर्गत कलहाला सामोरे जावे लागले. त्यांच्या समर्थकांचा गट आणि पक्षातील जुने कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला आहे. पटेल यांच्या या निर्णयाचा फटका भाजपला बसू शकतो, असे सिंधिया गटाच्या एका नेत्याने सांगितले. पटेल हे नीमचमधील मोठे नेते आहेत. ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होते आणि त्यांनी पक्षाला आधार दिला. सिंधिया हे त्यांचे गॉडफादर आहेत. ते सिंधिया यांच्या लेफ्टनंटसारखे आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या गोटातील आणखी एका नेत्याने सांगितले की, आणखी अनेक समर्थक लवकरच काँग्रेसमध्ये परततील. या नेत्यांशी बोलण्यात अर्थ नाही, कारण भाजप सिंधिया समर्थकांशी असलेले मतभेद मिटवत नाही. आपण यावर काय करू शकतो?” बाहेर पडल्यानंतर पटेल यांनी सकलेचा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

News Title : BJP Scindia supporter Samandar Patel return back to congress 20 August 2023.

हॅशटॅग्स

#Samandar Patel(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x