11 May 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे
x

Titagarh Rail Share Price | 1 वर्षात 400 टक्के परतावा देणाऱ्या टीटागड रेल शेअरची सर्वच बाजूने खरेदी वाढली, पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?

Titagarh Rail Share Price

Titagarh Rail Share Price | मागील 3 वर्षात टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 24 रुपयेवरून वाढून 827.95 रुपये किमतीवर पोहोचली आहे. ही कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत देखील होती.

मागील तीन वर्षात भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि भारत सरकारने देखील पायाभूत सुविधांममध्ये भरघोस गुंतवणूक केली आहे. याचा सर्वात जास्त फायदा रेल्वे क्षेत्राला झाला आहे. आणि टीटागड रेल सिस्टीम्स कंपनी देखील यात लभार्थी आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के घसरणीसह 784.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये आधीच खूप वाढ झाली आहे, अशा स्थितीत आता गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे ठरू शकते. ज्या गुंतवणूकदारांना या स्टॉक मध्ये पैसे लावायचे आहेत, त्यांनी स्टॉकमध्ये सुधारणा होण्याची वाट पाहावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. काही तज्ज्ञांच्या मते टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 900 रुपयांपर्यंत वाढू शकतात. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करताना 775 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका वर्षात टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, भारत सरकार पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आणि मुख्यतः सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये नवीन सुधारणा करत आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टीटागड रेल सिस्टीम्स कंपनी देखील सामील आहे. भारत सरकारच्या गती शक्ती अभियानांतर्गत नुकताच सरकारने 4 नवीन रेल्वे प्रकल्पांची घोषणा केली आहे. म्हणून काही तज्ञ टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titagarh Rail Share Price today on 28 August 2023.

हॅशटॅग्स

Titagarh Rail Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x