26 April 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
x

सामना'त खिल्ली उडवल्याने पुसदच्या न्यायालयाने कोणाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते?

Uddhav Thackeray, MP Sanjay Raur, Saamana

यवतमाळ : शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’ मुखपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून त्यात मराठा समाजातील तरुण तरुणींना ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवलं होतं. दरम्यान मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने एप्रिल महिन्यात अटक वॉरंट जारी केला होते याची किती जणांना कल्पना होती. समन्स बजावून देखील सर्व आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या हक्कावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सध्या रंगली आहे आणि त्यावरून अनेक पुरावे मराठा समाजातील युवक व्हायरल करत आहेत. तसेच आता विनोद पाटलांवर देखील संधीसाधू अशी टीका होऊ लागली असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठीच हा खटाटोप केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेतील वरिष्ठांनीच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विनोद पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची घाई केली आणि या विषयाचे क्रेडिट घेण्याची योजना आखल्याचे बोलले जाते आहे. पेशाने वकील असलेले शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये महत्वाची बजावल्याचे बोलले जाते आहे. असं असलं तरी विनोद पाटील यांच्यापेक्षा मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्वाधिक मेहनत ही आमदार निलेश राणे यांनी घेतल्याचे पाहायला मिळाली होती. तसेच मराठा आरक्षणाचा मसुदा तयार करणाऱ्या राणे समितीची देखील यामध्ये महत्वाची भूमिका होती. दरम्यान उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर स्वतः निलेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात ते टिकावे म्हणून आधीच कॅव्हेट दाखल केले आहे. मात्र शिवसेनेने केंद्रित घेण्यासाठी थेट विनोद पाटलांनाच विधानसभा निवडणुकीचे आमिष दाखवून मातोश्रीवर निमंत्रण दिले आणि हवा स्वतःच्या बाजूने हवा निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रचार केल्याचे पाहायला मिळले होते.

स्वतः निलेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात ते टिकावे म्हणून आधीच कॅव्हेट दाखल केले आहे.

दरम्यान राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दैनिक सामनामधून व्यंगचित्राद्वारे ‘मुका मोर्चा’ असे संबोधून संपूर्ण मराठा समाजाची खिल्ली उडवून अपमान केल्याची तक्रार पुसदचे अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. २२ एप्रिल रोजी या तिघांनाही न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयासमोर उपस्थित न झाल्याने न्या. बाजड यांनी सोमवारी या तिघांविरुद्ध वॉरंट बजावले होते. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई हे सध्या सामनामध्ये नाहीत. त्यांना समन्स बजावण्यात आला होते.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले होते. राज्यभर अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने मराठा समाजाने मोर्चे काढले होते. अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे कौतुक केले होते. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र अ‍ॅड. विनोद पाटील यांनी या सर्व विषयांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा फायदा पाहिल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान ‘सामना’त प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आले होते. या व्यंगचित्रानंतर शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवसेनेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, संतप्त आणि नाराज मराठा समाजातील व्यक्तींनी ठिकठिकाणी ‘सामना’विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. मराठा समाजाच्या वतीने दैनिक सामनाची होळी करण्यात आली होती. तसेच उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांचे प्रतिकात्म पुतळे जाळण्यात आले होते.

 

Web Title:  Abusive words used against maratha kranti morcha warrant against shivsena chief uddhav thackeray and MP sanjay raut

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x