10 May 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी
x

Rushil Decor Share Price | रुशील डेकोर शेअर अल्पावधीत मालामाल मोठा परतावा देतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या

Rushil Decor Share Price

Rushil Decor Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव असताना रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 393 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 362 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रुशील डेकोर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1030 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के घसरणीसह 367 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रुशील डेकोर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 408 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 26 टक्के मजबूत झाले आहेत.

शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 265 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 50 टक्के नफा कमावला आहे. 14 जून 2013 रोजी रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 22 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रुशील डेकोर कंपनीने तिमाही आधारे 6 टक्के वाढीसह 204.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 5 टक्क्यांच्या घसरणीसह 29.45 रुपये नोंदवला गेला होता. या कंपनीचे EBITDA मार्जिन 14.39 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रुशील डेकोर कंपनीचा PAT 13 टक्क्यांच्या घसरणीसह 10.55 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

या कंपनीचा ईपीएस मागील तिमाहीत 5.31 रुपयेवरून 3.88 रुपयेवर आला आहे. रुशील डेकोर कंपनीने नुकताच वीर MDF साठी AI निर्मित टीव्ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नवीन जाहिरात मोहिमेमुळे कंपनीचा व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rushil Decor Share Price NSE 20 December 2023.

हॅशटॅग्स

Rushil Decor Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x