23 May 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्ससह आणखी दोन शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर, व्होल्टास आणि रॅलिस इंडिया या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स पुढील काही दिवसात 19 टक्के नफा कमावून देऊ शकतात.

या तिन्ही कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा पॉवर ही वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे. तर रॅलिस इंडिया ही कृषी-रसायने बनवणारी कंपनी आहे. आणि व्होल्टास ही घरगुती उपकरणे बनवणारी कंपनी आहे.

टाटा पॉवर कंपनी : Tata Power Share Price
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 450 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 19 टक्के वाढू शकतात. टाटा पॉवर कंपनीची एकूण वीज निर्मिती क्षमता 14,294 मेगावॅट आहे. यापैकी 38 टक्के ऊर्जा स्वच्छ हरित स्रोतांमधून निर्माण केली जाते. टाटा पॉवर कंपनीने PSP प्रकल्पाद्वारे 30 GW RTC ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सोमवारी हा शेअर 0.026% वाढून 378.50 रुपयांवर ट्रेड करत होता.

रॅलिस इंडिया लिमिटेड : Rallis Share Price
ब्रोकरेज फर्मने रॅलिस इंडिया कंपनीचे शेअर्स 260 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 6.51 टक्के वाढू शकतात. Rallis India ही कंपनी भारतातील एक प्रतिष्ठित कृषी रसायन उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतीय बाजापेठेत मजबूत वितरण नेटवर्क, ब्रँडेड फार्म सोल्यूशन्स आणि नवीन उत्पादन लॉन्चसह कृषी क्षेत्रातील व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. सोमवारी हा शेअर 1.25% वाढून 247.35 रुपयांवर ट्रेड करत होता.

व्होल्टास लिमिटेड : Voltas Share Price
शेअर बाजारातील तज्ञांनी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1,112 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 1.54 टक्क्यांनी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय EMP प्रकल्प व्यवसायातून होणाऱ्या अतिरिक्त तोट्याबाबत अनिश्चितता असल्यामुळे व्होल्टास कंपनीच्या कमाईत चढ उतार पाहायला मिळू शकते. कमाई करण्यासाठी गुंतवणुकदार या कंपनीचे शेअर्स 1,112 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 26 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x