2 May 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

धक्कादायक! शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

Shivsena, Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Aaditya Thackeray, Rape

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावल बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणात त्याला अटकही करण्यात आली आहे. प्रधान पाटील असं या माजी नगरसेवकाचे नाव आहे. अंबरनाथमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुरुवारी बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी याची दखल घेत प्रधान पाटील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी प्रधान पाटील याला अटक केली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील संपूर्ण माहिती समोर येईल.

दरम्यान एप्रिल २०१८ मध्ये एडीआर’ने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात भारतातील ५१ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले होते. त्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता आणि त्यांच्या १४ लोकप्रतिनिधी, शिवसनेच्या ७ आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या ६ लोकप्रतिनिधीं विरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्या अहवालानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अडचणीत सापडले होते.

‘एडीआर’ म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंग, अपहरण, बलात्कार, वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे असं स्पष्ट केलं आहे. एडीआरने संपूर्ण राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ५१ खासदार आणि आमदारांपैकी महाराष्ट्रातील १२ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. तर द्वितीय स्थानी पश्चिम बंगाल आहे. त्यात आता शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने अजून एक भर टाकली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x