26 April 2024 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

यूपी: हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

UP kamlesh Tiwari, Hindu Samaj Party

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास सुरु आहे. तसेच, ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्याठिकाणाहून पोलिसांनी काही शस्त्रे आणि काडतूस जप्त केले आहे. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनऊ भागातली दुकानंही बंद करण्यात आली होती. आता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत.

कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास १०० हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x