28 April 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख

BJP, Union Minister Ravi Shankar Maharashtra, Chattrapati Shivaji Maharaj

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक विजय झाला होता. मग शिवसेना पहिल्या दिवसापासून कुणाच्या इशाऱ्यावरुन वागत होती? असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का? असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.

तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? महाविकासआघाडीने एकदा तरी सत्तेचा दावा राज्यपालांकडे केला का? असा सवाल भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी करत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट एकत्र येत सत्तेचा दावा केला. नवीन युती स्थिर सरकार देणार आहे असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर टीका करताना मोठी चूक केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chattrapati Shivaji Maharaj) वारंवार एकेरी उल्लेख केला. यानंतर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chattrapati Sambhajiraje) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रवीशंकर प्रसाद यांनी तातडीने माफी मागावी, अशी जाहीर मागणी संभाजीराजेंनी पत्राद्वारे केली. शिवाय राजकारण्यांनी शिवरायांचं नाव बदनाम करू नये, असं आवाहनही त्यांनी सर्वपक्षीयांना केलं.

हॅशटॅग्स

#Ravi Shankar Prasad(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x