27 April 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे आमदार जागेवरच; टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या खयाली कहाण्या कोणासाठी? सविस्तर

Shivsena, NCP, Shivsena, BJP

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणाऱ्या आणि त्यांना राज्याला स्थिर सरकार देण्याचं आश्वासन देणाऱ्या अजित पवारांना राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी मोदींना धन्यवाद देणारं ट्विट केल्यानंतर शरद पवारच आपले नेते असल्याचं दुसरं ट्विट केलं. त्यावरुन शरद पवारांनी अजित पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एका बाजूला राष्ट्रवादीने ४-५ आमदार वगळता सर्व आमच्यासोबत उपस्थित आहेत हे ऑन कॅमेरा स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे सर्वांच्या सर्व आमदार एकत्र थांबले आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या संपर्कात आहेत. तर काँग्रेसचे देखील सर्व आमदार एकत्र आहेत आणि त्यांचे स्थानिक नैत्रुव देखील त्यांच्यासोबत आहे. मात्र दुपारपासून नेमकं कसं झालं की ऑपरेशन लोटसच्या नावाने खयाली कहाण्या बनवून त्या सातत्याने सुरु ठेवून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्र्वादीत संभ्रम निर्माण करतील याची शिस्तबद्ध काळजी घेतली जात असल्याचं दिसत आहे. अगदी वाट्टेलत्या बातम्या पसरवून काही टीव्ही वृत्तवाहिन्यांना नेमकं सध्या करायचं आहे त्याची चर्चा होताना दिसत आहे आणि स्वतः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये त्याची हसत का होईना चर्चा रंगल्याच प्रतिनिधींना समजलं आहे. वास्तविक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही वृत्त वाहिन्यांशी सत्ताधाऱ्यांनी संपर्क तर केला नाही ना अशी शंका उपस्थित होताना दिसत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातही ही तयारी सुरू झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र सर्वात हासास्पद गोष्ट म्हणजे राजकारणात वजन शिल्लकच राहिलेलं नसलेल्या नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राजकारणात वेगळा पक्ष काढून देखील डाळ न शिजल्याने नारायण राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची वेळ आली आणि त्यात जेव्हा नारायण राणेंनी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हटल्यावर सुधीर मुंनगंटीवार यांनी त्याला छेद देत राणेंचं भाजपातील वजन निश्चित केलं होतं.

त्यानंतर काँग्रेसमध्ये विरोधीपक्ष नेतेपदावर राहिलेले राधाकृष्ण विखे-पाटील संपूर्ण नगरजिल्ह्यात स्वतःच धापा टाकत निवडून आले आणि नगर जिल्ह्यातील त्यांचं नेमकं अस्तित्व सिद्ध झालं आणि भाजपमध्ये देखील त्यांचं मूल्य कमी झालं. गणेश नाईक यांचावर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुलानेच कृपा करण्याची वेळ आली होती, तर बबनराव पाचपुते यांचा मागील इतिहास समजून घेण्यात काहीच अर्थ नाही, कारण सध्या बबनराव पाचपुते नावाचे आमदार राज्यात आहेत हे जरी लोकांना माहित असलं तरी भरपूर म्हणावं लागेल. याच ४ लोकांना सध्या राजकीय कृपेची आवश्यकता असताना त्यांना “ऑपरेशन लोटस” असे एखाद्या लष्करी मोहिमेसारखे शब्दप्रयोग वापरून, त्यांच्यावर सरकार स्थापन करण्याची जवाबदारी देण्यात आल्याच्या बातम्या पेरणी करणं म्हणजे हास्यास्पद म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x