2 May 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडल्याची इराणी सैन्याची कबुली

Iranian Military, Ukrainian aircraft

तेहरान: युक्रेनचं प्रवासी विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात पाडल्याची कबुली इराणने दिली आहे. इराणच्या लष्कराने ही मानवी चूक असल्याचं म्हटलंय. इराणच्या हल्ल्यात विमानातील १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ‘युक्रेनच्या विमानाचा तेहरानजवळील अपघात क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे झाला नव्हता, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असा दावा इराणचे नागरी हवाई उड्डाणप्रमुख अली आबेदजाहेद यांनी शुक्रवारी केला होता.

हे विमान मानवी चुक होती. हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं, अशी कबुली इराणी लष्करानं दिली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. युक्रेनचे जे विमान बुधवारी अपघातग्रस्त झाले ते प्रत्यक्षात इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी सांगितलं होतं. हे विमान तेहरान येथील विमानतळावरून उडाल्यानंतर कोसळलं होतं. या अपघातात १७६ जण ठार झाले, त्यात कॅनडाच्या ६३ नागरिकांचा समावेश होता.

हे विमान बुधवारी तेहरान येथील खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जाण्यासाठी सकाळी ६.१० मिनिटांनी निघाले होते. विमानतळाच्या वायव्य दिशेला ४५ किलोमीटरवर शहरीयार परगण्यातील खलाज अबाद येथे ते शेतात कोसळले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते रडारवरून अदृश्य झाले होते. या दुर्घटनेत १७६ जाणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ८२ इराणी, ६३ कॅनडाचे, ११ युक्रेन, १० स्वीडन, ४ अफगाणिस्तानचे, जर्मन व ब्रिटनचे प्रत्येकी ३ नागरिक होते.

 

Web Title:  Iranian Military confirmed they unintentionally shot down Ukrainian aircraft as per local News report.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x