26 April 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुंबईतील कार्यालयाचे दरवाजे बुधवारपासून पुन्हा उघडणार

Gopinath Munde, Pankaja Munde

पुणे: भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील शहरातील कार्यालय येत्या बुधवारी म्हणजे १२ तारखेला सुरू होणार आहे. परळीतील कार्यक्रमात मुंबईतील हे कार्यालय सुरु करण्याची जाहीर घोषणा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी केली होती.

वरळीच्या शुभदा बिल्डिंगमधील कार्यालय २६ जानेवारीला पुन्हा सुरू करण्यात येणार होते; परंतु सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार असल्याचाही चर्चा सुरु होत्या, मात्र ५ फेब्रुवारी तारीख देखील पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता १२ फेब्रुवारीला कार्यालय सुरु होणार आहे.

दरम्यान आता भाजपचं हायकमांड महाराष्ट्रात मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक घटना घडल्या होत्या. पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गतही नाराजी उफाळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यताही आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असं झालं तर चंद्रकांत पाटील यांची विरोधीपक्ष नेते पदावर निवड होऊ शकते तर पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्या सध्या नाराज आहेत.

तत्पूर्वी क्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं आहे. ते उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने करण्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला होता.

‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सत्तेत असतानाच हाती घेतलेल्या योजना पुढे घेऊन जा, त्याचे आम्ही समर्थन करू; पण त्यास खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरून लढाई करू,’असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला होता.

 

Web Title:  BJP Leader Gopinath Mundes Mumbai office will reopen again.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x