4 May 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा, मुनगंटीवारांचं पवारांना प्रतिउत्तर

BJP Leader Sudhir Mungantiwar, Sharad Pawar, Ram Mandir Trust, babri Mosque

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवरुन केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल मुनगंटीवारांनी पवारांना विचारला.

तत्पूर्वी, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही ? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे.” असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राम मंदिर होते, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तसेच तिथे राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा संसदेत केली होती. त्यानंतर बुधवारी या ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाला होती. या बैठकीत महंत नृत्य गोपाल यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

 

English summary: BJP Leader and Former Forest minister of Maharashtra Sudhir Mungantiwars answer to NCP President Sharad Pawar over Ram Mandir Trust Ayodhya Babri Mosque in Ayodhya Uttar Pradesh.

 

Web Title: Story BJP Leader and Former Minister Sudhir Mungantiwars answer to NCP President Sharad Pawar over Ram Mandir Trust Ayodhya Babri Mosque in Ayodhya Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x