22 August 2019 11:57 PM
अँप डाउनलोड

आधी विहिरी गायब आता 'ती' करोडो झाडं गायब? केंद्राच्या समृद्ध जंगलाच्या यादीत राज्याचं नाव नाही

आधी विहिरी गायब आता ‘ती’ करोडो झाडं गायब? केंद्राच्या समृद्ध जंगलाच्या यादीत राज्याचं नाव नाही

मुंबई : भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.

दरम्यान, मागील ५ वर्षांपासून फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे? असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे.

सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं आहे. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#NCP(149)#Sudhir Mungantiwar(10)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या