2 May 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

National Gold Medalist Boxer Pranav Raut commits suicide

अकोला: अकोला जिल्ह्यातील बॉक्सरपटू प्रणव राऊत याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील शास्त्री स्टेडीयम जवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने गळफास घेतला. प्रणव राऊत हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता खेळाडू आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज (शुक्रवार, २१ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रणवनं महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदक जिंकली होती. मात्र त्यानं अचानक उचलेल्या या पावलामुळं त्याच्या प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. प्रणवनं सकाळी नऊच्या सुमारास शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथे गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रीडा प्रमुखांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचेही सांगितले. पोलीस तपास करत असून अद्याप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

प्रणव कालपर्यंत ठिक होता. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात नसल्याचे मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी सांगितले. वयाच्या २२व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Story Akola gold medalist boxer Pranav Raut commits suicide in Hostel.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x