3 May 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

हैदराबाद: लॉकडाउनला कंटाळून स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक

migrant labourers, staged protest, Lockdown

हैदराबाद, २९ एप्रिल: कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना आपल्या राज्यात पुन्हा पाठवायला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहखात्याने परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात जायला परवानगी देण्यात आली आहे, पण याबाबत गृहखात्याने काही अटी ठेवल्या आहेत.

परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मागणी गेले कित्येक दिवस अनेक राज्यांकडून होत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातल्या मजुरांसाठी रेल्वेने स्पेशल ट्रेन सोडावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत केली होती.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रकोप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावून लोकांना घरातच राहण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, देशातील वेगवेगळ्या भागात स्थलांतरित मजूर एकत्र आल्याची छायाचित्रे चिंता वाढवणारी ठरत आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मंगळवारी सुमारे २४०० मजुरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

हैदराबाद आयआयटी येथे बांधकामाच्या साईटवर काम करणारे सुमारे २४०० मजूर बुधवारी रस्त्यावर उतरले. या मजूरांना आपल्या घरी जायचे आहे. त्याच्या मागणीसाठीच ते रस्त्यावर उतरल्याचे संगारेड्डी ग्रामीण पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस त्यांची समजूत घालत आहेत. याचदरम्यान काही संतप्त मजुरांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. नाराज मजुरांनी परिसरात तैनात पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.

 

News English Summary: People were instructed to stay indoors and observe social distance by imposing lockdowns across the country to prevent the spread of the corona virus. However, photographs of migrant workers coming together in different parts of the country are raising concerns. In Hyderabad, the capital of Telangana, about 2,400 workers took to the streets on Tuesday to protest.

News English Title: Story After Delhi and Maharashtra states now migrant labourers staged protest at construction sites in IIT Hyderabad Telangana amid lockdown News latest Updates..

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x