6 May 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

मध्य रेल्वेकडून लोकल ट्रेन पुन्हा सुरू होण्याबाबत स्पष्टीकरण

Indian Railway, Mumbai Local, Central Railway, Unlock

मुंबई, १४ जून: गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशीरा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कधीही न थांबणारी मुंबई शांत झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मायानगरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला कळवीली आहे. रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या याबाबत चर्चा सुरू असून लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

 

News English Summary: Railways said it has not received any official notification regarding resumption of local services. Late on Saturday night, Central Railway’s public relations officer Shivaji Sutar shared the information via Twitter.

News English Title: About Starting Of Suburban Trains In Mumbai Central Railway Says We Havent Received Such Instructions In This Direction News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x