27 April 2024 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पवार'नीतीला सुरुवात | खडसेंपासून भाजपाला राजकीय धक्के देण्यास अधिकृत सुरुवात

Leader Eknath Khadse, NCP Sharad Pawar, big blow to BJP

मुंबई, २३ ऑक्टोबर: भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आयुष्यातली ४० वर्षे मी भाजपामध्ये काम करत आलो आहे. ४० वर्षे पक्षात राहिल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत वारंवार माझी बदनामी झाली, छळ करण्यात आला. गैरव्यवहार असेल तर कागदपत्रं द्या.. मात्र या क्षणापर्यंत मला उत्तर मिळालेला नाही. मी आजवर खूप संघर्ष केला. मंत्रिमंडळात येण्यासाठीही मला संघर्ष करावा आहे. तो माझा स्थायीस्वभाव आहे. भाजपाचं काम करत असताना उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळकटी देण्याचं काम आम्ही सातत्यानं केलं. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपात माझ्यावर अन्याय झाला आहे असंही खडसे यांनी आज बोलून दाखवलं.

 

News English Summary: Senior leader Eknath Khadse has left the BJP and joined the Nationalist Congress Party. The party was inaugurated in the presence of NCP MP Sharad Pawar and Eknath Khadse was admitted by state president Jayant Patil. Pro-Khadse activists also carried the NCP flag. Rohini Khadse was joined by MP Supriya Sule.

News English Title: Leader Eknath Khadse finally joins NCP Sharad Pawar big blow to BJP News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x