6 May 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

प्रत्येक भाषेत रिपब्लिक TV सुरू करणार | पण अर्णबची नेमकी योजना काय? - सविस्तर वृत्त

Republic TV, local languages Channel, Arnab Goswami

मुंबई, १२ नोव्हेंबर: वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

मात्र तुरूंगातून सुटका झाल्यावर अर्णब गोस्वामी पुन्हा आक्रमक झाला आहे. “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसंच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचं ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असंही त्यांनी आक्रमक होत म्हटलं. तसंच अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणा केली. भारतीय प्रसार माध्यमांच्या स्थानिक भाषेतील वृत्त वाहिन्या सुरु करून अर्णब गोस्वामी एकूणच आर्थिक गणित मांडत असल्याचं समोर आलं आहे. यामार्गे रिपब्लिक इतर स्थानिक वाहिन्यांचा जाहिरातींचा पैसा देखील स्वतःकडे आकर्षित करून इतर वाहिन्यांना आर्थिक संकटात टाकून त्यांना टाळं ठोकेल याची शक्यता नाकारता येतं नाही. आधीच लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या वृत्त वाहिन्यांनी मोठी कोस्ट कटिंग केली आहे. मात्र आता त्यांना स्थानिक पातळीवर देखील प्रचंड स्पर्धा निर्माण करून त्याने प्रसार माध्यमांविरुद्धच मोठी रणनीती आखल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील काही दिवसांपासून रिपब्लिक टीव्हीवर ‘लॉबी’ हा शब्द प्रयोग केला जातं होता आणि त्यांच्या विरुद्धच त्याने आर्थिक युद्ध पुकारलं आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे उद्या जर तो यशस्वी झाला तर मात्र प्रसार माध्यमांमध्येच एक आणीबाणी निर्माण केली जाईल अशी शक्यता याच क्षेत्रातील तज्ज्ञ बोलत आहेत. त्यामुळे स्थानिक वृत्त वाहिन्यांना देखील हा सावधान असा इशाराच म्हणावा लागेल.

 

News English Summary: He also announced that he would now launch Republic TV in every language. He also said that he has a presence in the international media. “I will start a channel from inside the jail and there is nothing you can do,” he said aggressively.

News English Title: Republic TV will start in all local languages announced by Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x