29 April 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भांडं फुटलं | भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर रिपब्लिक TV'मध्ये भागीदार होते - सविस्तर वृत्त

BJP MP Rajeev Shekhar, Partner with Republic TV, editor Arnab Goswami

मुंबई, १३ नोव्हेंबर : अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप भाजपा नेते किरी सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला होता. दरम्यान, यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष देखील रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले आर्थिक संबध लपवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वास्तविक रिपब्लिक चॅनेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा थेट भाजपाच्या नेत्यांशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याबाबत सचिन सावंत यांनी देखील ट्विट केलं आहे.

अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. मात्र ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.

तत्पूर्वी राजीव चंद्रशेखर यांनी भाजपामध्ये रुजू झाल्यामुळे आणि भाजप खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या मालकीचे रिपब्लिक टीव्हीचे बरेचसे शेअर्स अर्णब गोस्वामी यांना बायबॅक करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर त्यांची एशियानेट न्यूज मीडिया अँड एंटरटेनमेंट रिपब्लिक टीव्हीमधील अल्प भागीदार झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामी यांना का वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय येण्यास सुरुवात होईल असं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Since Rajiv Chandrasekhar joined the BJP and was elected as a BJP MP, he had asked Arnab Goswami to buy back most of his shares in Republic TV and later became a small partner in Asianet News Media and Entertainment Republic TV. Therefore, it is said that the realization of why BJP leaders are trying to save Arnab Goswami will begin to emerge.

News English Title: BJP MP Rajeev Shekhar was partner with editor Arnab Goswami in Republic news channel updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x