29 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

पत्नी व आईची काळजी नसलेल्यांना महिलांच्या समस्या काय समजणार

पुणे : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्या विरोधात स्वतः महिलांनी एकत्र येऊन रान उठविण्याची गरज आहे. सरकारची सुद्धा तशी जवाबदारी असते, परंतु स्वतःच्या पत्नी व आईची काळजी नसलेल्या पंतप्रधानांना स्त्री वर्गाच्या समस्या आणि व्यथा काय समजणार अशी खरमरीत टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, एकूणच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून खूप अस्वस्थ वाटत परंतु देशातील सरकार मात्र यावर गंभीर नसल्याचं दिसत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर दिसत आहेत. परंतु दुसऱ्याबाजूला स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता अगदी सुरुवाती पासूनच म्हणजे मुलांच्या शालेय शिक्षणापासून महिलांचा आदर करण्याचे धडे देण्याची गरज आहे. परंतु आपल्या देशात तशी शिक्षण व्यवस्थाच नसल्याची खंत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रणिती शिंदे यांच्या सोबत मंचावर खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला सुद्धा १९ वर्षाची मुलगी आहे. ती घराबाहेर गेली की एक आई म्हणून मला सुद्धा चिंता वाटते. परंतु स्त्रियांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने अच्छे दिन दिलेच नाहीत. तसेच महागाईसुद्धा गगनाला भिडली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x