2 May 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे | पण शेतकऱ्यांसाठी नाही - शरद पवार

NCP President Sharad Pawar, Governor Bhagat Singh koshayari, Farmers protest

मुंबई, २४ जानेवारी: आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.

यावेळी शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं की, देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात तुमचे मनापासून धन्यवाद देतो. ही लढाई सोपी नाही, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची आस्था नाही. पंतप्रधान शेतकऱ्यांची विचार पूस करत नाही , हे शेतकरी काही पाकिस्तानमधील आहेत का? पंजाबमधील शेतकऱ्यांचं देशासाठी योगदान मोठं आहे. सरकारच नाकर्तेपणा दाखवत आहे, याचा निषेध करतो. भाजपकडून चर्चा न करता कायदा मंजूर करण्यात आले. बोलू दिल नाही, केलेला कायदा मागे घ्या किंवा नका घेऊ पण देशातील जनता कायदा आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार हे नक्की. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल भेटले आहेत , इथे शेतकरी भेटणार म्हणून राज्यपाल गेले गोव्याला असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही असा घणाघात देखील पवारांनी केला.

दुराकीडे शेतकरी नेते अशोक ढवळेंनी मोदी-शाहांवर घणाघात करताना, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाहीअसा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे.

 

News English Summary: The law was passed without discussion by the BJP. I don’t want to talk, take back the law or not, but the people of the country will destroy the law and you. The governors in the history of Maharashtra have met. The governor went to Goa to meet the farmers. He has never seen such a governor in Goa. It is time for him to meet Kangana, but not to meet the farmers.

News English Title: NCP President Sharad Pawar slams state governor Bhagat Singh koshayari over farmers protest in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x