6 May 2024 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाह | तर हमारे दो म्हणजे अंबानी-अदानी - अशोक ढवळे

Mumbai, farmers protest, Ashok Dhawale, Modi govt

मुंबई, २४ जानेवारी: आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.

शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाहीअसा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पुलावची पाकिटे, फळं, डाळ आणि चपातीची व्यवस्था केलीय. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप केले जाईल.

शेतकऱ्यांसाठी अन्न वाटपाची व्यवस्था पाहणाऱ्या दलजित सिंग यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. अनेक राजकीय नेते सुद्धा मदतीसाठी पुढे आले असून, त्यांनी सुद्धा अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.

 

News English Summary: Farmer leader Ashok Dhawale’s attack on Modi-Shah, Modi’s hum do means Modi and Shah, while our do means Ambani and Adani. Modi-Shah sold everything in the country, now they are selling it to farmers. From now on, they have sold the country. However, Ashok Dhawale has warned that we will not allow this to happen.

News English Title: Mumbai farmers protest Ashok Dhawale slams Modi govt news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x