2 May 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

शेतकरी आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणाच कारणीभूत - बच्चू कडू

Minister Bacchu Kadu, PM Narendra Modi, Famers protest

मुंबई, २४ जानेवारी: आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.

शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाहीअसा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनासंदर्भात राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मोदींनी हेकेखोरपणा सोडावा, असे म्हटलंय. तसेच, आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला मोदींचा हेकेखोरपणाच पुन्हा आडवा आला, असेही कडू यांनी म्हटलंय.

बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेकेखोरपणाच कारणीभूत असल्याचं म्हटलंय. ”26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, किमान या दिवशीतरी पंतप्रधानांनी प्रजेचं ऐकून निर्णय घ्यावा. आपण राजा नसून प्रजा हीच राजा आहे, असेही कडू यांनी म्हटलंय. मोदी सरकार हे विसरले आहे की आपण राजा नाही, प्रजा राजा आहे. शेतकरी राजाच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर याचे उग्र स्वरुप येत्या काळात बघायला मिळणार,” असा इशाराही कडू यांनी मोदी सरकारला दिला आहे.

दुसरीकडे आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पुलावची पाकिटे, फळं, डाळ आणि चपातीची व्यवस्था केलीय. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप केले जाईल.

 

News English Summary: All the three parties in the Mahavikas Aghadi government have declared support for the farmers’ movement. Regarding this agitation, Minister of State and Sarvesarva Bachchu Kadu of Prahar Sanghatana said that Modi should give up his stubbornness. Also, minister Bacchu Kadu also said that Modi’s stubbornness prevented the issue of agitation from going away.

News English Title: Minister Bacchu Kadu slams PM Narendra Modi over famers protest from long time news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x