27 April 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले | त्यांनीच पदाचा मान ठेवला नाही

Minister Bacchu Kadu, Governor Bhagat Singh Koshayri

अमरावती, ११ फेब्रुवारी: राज्यपाल गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली.

तसेच विनाअनुदानित शाळांची ग्रँट वाढवण्याचा निर्णयही यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केला. ज्या शाळांना सध्या 0 ते 20 टक्के इतकी ग्रँट मिळत आहे त्यांची ग्रँट लवकरच 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

त्यासोबतच राज्यात अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या सीबीएसई शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यासाठी राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. आतापर्यंत नागपूरात पाच शाळांवर अशाचप्रकारे कारवाई करण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

News English Summary: The governor has behaved like a Bharatiya Janata Party (BJP) activist over the past year, not honoring the governor’s post, said Minister of State Bachchu Kadu. He clarified that denying government air travel to the governor was only a technical issue.

News English Title: Minister Bacchu Kadu criticised governor Bhagat Singh Koshayri news updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x