27 April 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ | ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती जाहीर

A committee of members, Legislative Assembly, 33 crore trees planted, Former Fadnavis govt

मुंबई, १० मार्च: विद्यमान विरोधीपक्षनेते आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आज सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत. (A committee of members of the Legislative Assembly will probe the 33 crore trees planted by former Fadnavis govt)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबवण्यात आली होती. २०१६ ते २०१७ आणि २०१९-२० या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत २८.२७ कोटी वृक्ष लावले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० च्या शेवटी त्यापैकी ७५.६३% रोपटे म्हणजे २१ कोटी रोपटे जिवंत आहेत. त्याची अजुनही देखभाल करण्यात येत आहे.

२०१७ ते २०१९ कालावधीत वन विभागाने व्यक्ती, संस्था, सरकारी संस्था, संघटना आणि उद्योग समूहांच्या माध्यमातून ५० कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबवली. यासाठी २०१६-२०१७ पासून २०१९-२०२० पर्यंत २ हजार ४२९ कोटी ७८ लाख रुपये निधी मिळवला आणि तो पूर्ण निधी वापरण्यात आला. त्यातील 25 टक्के रोपटे जिवंत कशी राहू शकली नाहीत याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी दत्तात्रय भरणे यांनी केली होती. तीच उचलून धरताना याची विधिमंडळाकडून चौकशी व्हावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.

 

News English Summary: A committee of members of the Legislative Assembly will probe the 33 crore trees planted in the state by the present Leader of Opposition and the then government of Devendra Fadnavis. For this, a committee of 16 MLAs from all parties has been announced today and the chairman of this committee will be Minister of State Dattatraya Bharne.

News English Title: A committee of members of the Legislative Assembly will probe the 33 crore trees planted by former Fadnavis govt news updates.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x