2 May 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

गिरीश महाजन पोकळ ठरले | जळगाव भाजपचे ३० नगरसेवक ठाण्यात | शिवसेनेच्या गळाला

Shivsena, Jalgaon, Girish Mahajan

ठाणे, १६ मार्च: शिवसेनेने जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गडाला खिंडार पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ३० नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.

१८ मार्चला जळगावच्या महापालिकेची महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीच्या अगोदरच शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे ३० नगरसेवक आपल्याकडे वळवून भारतीय जनता पक्षाच्या गडाला खिंडार पाडली आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी राज्य भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ उद्धवस्त केले आहे.

जळगाव महापालिकेचे शिवसेनेने फोडलेले नगरसेवक हे सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीत गिरीश महाजन यांचा पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच धक्का देण्याची रणनीती शिवसेनेकडून आखण्यात आली आहे. या महापालिकेचे महापौर पद सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. आता नव्या महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक असताना भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत सरळ मुंबई गाठली. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याचे समजत आहे. हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाल्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग सोप्पा होणार आहे.

 

News English Summary: Shiv Sena has breached the fort of Bharatiya Janata Party in Jalgaon. 30 BJP corporators have arrived in Thane. Therefore, out of 57 corporators of Bharatiya Janata Party, 30 corporators have joined Shiv Sena.

News English Title: BJP 30 corporators have arrived in Thane before Jalgaon Municipal corporations mayor election news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x