6 May 2024 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

सराफ अमृतराव गुगलेच्या पुतण्या विरोधात जागा बळकावने, अवैद्य सावकारी असे गंभीर गुन्हे | दबावासाठी खोटे आरोप?

बार्शी, १९ एप्रिल: बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.

बार्शी पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.

मात्र आता यापूर्वीच संबधित सराफ अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याने हा प्रकार स्थानिक पत्रकारांना हाताशी धरून केल्याचं म्हटलं जातंय. बार्शी तालुक्यात लोकांच्या जागा बळकावणे असे गंभीर गुन्हे सराफ अमृतराव गुगळे यांच्या पुतण्या विरोधात गुन्हे दाखल तसेच १० कोटीची तर अवैद्य सावकारी चालत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यासाठी त्यांनी आधीच राजकीय चर्चेत असलेल्या विषयाला धरून बेछूट आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचं म्हटलं जातंय.

कोणीही उठावं आणि कोणताही आकडा सांगून पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना लक्ष करावं अशी फॅशन झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बार्शीत काही स्थानिक पत्रकारांना हाताशी धरून सदर वृत्त सराफ अमृतराव गुगळे यांनी हा प्रकार केला असल्याचा आरोप करण्यात येतं आहे. सोलापूरमध्ये बार्शी येथे शिवसैनिकांनी आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

News English Summary: Meanwhile, Barshi city police inspector Santosh Giri Gosavi demanded Rs 5 lakh from him. Goldsmith Amrutrao Google has alleged that the shop was sealed due to his refusal to pay. All these installments have to be delivered to the Home Ministry, said police inspector Santosh Giri Gosavi.

New English Title: Sarafa Amrutrao Gugle made serious allegations against local police station in Barshi news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x