28 April 2024 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health first | डेंग्यू झाल्यास या पथ्याचा अवलंब करा । नक्की वाचा

home remedies for dengue

मुंबई २३ एप्रिल : दिवसेंदिवस डेंग्यू हा आजार डोकं वर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात. डेंग्यूच्या रूग्णांनी पाण्यात लगेच उकळतील अशाच पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे डेंग्यूच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंद घ्यायला हवं

आराम आणि योग्य खाणेपिणे हेच
डेंग्यू झाल्यास घरी आराम करण्यास सुरूवात करा. डेंग्यूमध्ये तुम्हाला भरपूर आरामाची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे डेंग्यूचा आजार झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते यामुळे तुम्ही लिक्विड डाएटचा समावेश करा. प्रत्येक एक ते दीड तासाला एक लीटर अथवा त्याहून अधिक लिक्विड डाएट घ्या. तसेच औषधेही घ्या. तसेच प्लेटलेट्स वाढतील असे भोजन घ्या.

पपईच्या पानांचा रस
हा डेंग्यूवर रामबाण उपाय आहे. पपईच्या पानांचा ताजा रस काढून प्यायल्यास शरीरात पांढऱ्या पेढी वाढण्यास सुरूवात होते. यामुळे प्लेट्लेट्स वाढतात तसेच इम्युनिटी सिस्टीमही मजबूत होते.

व्हिटामिन सी युक्त फळांचा रस
डेंग्यूमध्ये प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी व्हिटामिन सी युक्त फळांचा रस घेण्यास सुरूवात करा. संत्रे, लिंबू,आवळा, मोसंबी, डाळिंब अशा फळांचा डाएटमध्ये समावेश करा. या ज्युसमुळे इम्युनिटी वाढेल मात्र त्यासोबतच प्लेट्लेट्सही वाढतील.

हळदीचे प्रमाण वाढवा
डेंग्यूचा आजार झाला खाण्यामध्ये हळदीचे प्रमाण वाढवा. कारण हळदीमध्ये अँटीसेप्टीक गुण असतात. त्याशिवाय यात कर्क्युमिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इनफ्लामेशनसारखे गुण असतात यामुळे डेंग्यूमध्ये हळदीचा आहारात समावेश वाढवावा.

पालकही फायदेशीर
पालकमध्ये केवळ लोहच नव्हे तर ओमेगा ३ फॅटी अॅसिड अशते. याच कारणामुळे डेंग्यूमध्ये पालक खाल्ल्यास इम्युन तसेच प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते.

नारळपाणी भरपूर प्या
डेंग्यूमध्ये नारळपाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. दिवसांतून कमीत कमी तीन ते चार वेळा नारळपाणी घेतले पाहिजे. शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासोबतच मिनरल्स आणि व्हिटामिनची कमतरता दूर करण्याचे काम नारळपाणी करते. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत करते.

News English Summary: Dengue is on the rise day by day. Outbreaks appear to be exacerbated by climate change. Many attempts are made to protect this blood-sucking mosquito. If dengue is detected early, then you can get rid of dengue by following a diet. Doctors also advise dengue patients to consume the same substances that immediately boil in water. Therefore, dengue patients should include greens, soups, fruits including bananas and apples in their diet.

News English Title: Home remedies for dengue infection news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x