26 April 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

५ मिनिटांपूर्वी २ कोटीत विकलेली जमीन ट्रस्टने १८.५ कोटीला खरेदी केली | श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

Uttar Pradesh Assembly Election 2022

अयोध्या, १४ जून | अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.

संजय सिंह रविवारी लखनऊ येथे म्हणाले की, ‘ट्रस्टने १८ मार्च रोजी १८.५ कोटीत सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांच्याकडून जमीन खरेदी केली. हीच जमीन ५ मिनिटांपूर्वी हरीश पाठक व कुसुम पाठकांकडून २ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती. केवळ ५ मिनिटांत ही जमीन १६.५ कोटींनी महाग झाली. भाविकांच्या दानाची ही सर्रास लूट आहे. या दोन्ही व्यवहारांत डॉ. अनिल मिश्रा साक्षीदार आहेत.’ रजिस्ट्रीचा ई-स्टॅम्प ५.११ वाजता खरेदी केला गेला.

जेव्हा की रविमोहन तिवारी यांनी ही जमीन हरीश पाठकांकडून खरेदी केली त्याचा ई-स्टॅम्प ५.२२ वाजता खरेदी केला गेला. ट्रस्टने जमीन खरेदीसाठी आधीच ई-स्टॅम्प कसा खरेदी केला, असा सवालही त्यांनी केला. पवन पांडेय म्हणाले की, ‘जमिनीसाठी ट्रस्टने १७ कोटींचे आरटीजीएस केले. हे पैसे कुणा कुणाच्या खात्यात जमा झाले, याची चौकशी व्हावी. लोकांच्या धार्मिक भावनांशी विश्वासघात करणाऱ्यांची ईडी व सबीआय चौकशी व्हावी.

हा कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार:
सुरुवातीला ही जमीन हरीश पाठक, कुसुम पाठक यांच्याकडून सुलतान अन्सारी व रविमोहन तिवारी यांनी खरेदी केली तेव्हा साक्षीदार क्र. १ म्हणून डॉ. अनिल मिश्रा होते. डॉ. मिश्रा श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त आहेत. कोणत्याही धनादेशावर डॉ. मिश्रा हेच साईनिंग अॅथॉरिटी आहेत. अन्सारी-तिवारी यांनी जमीन श्री राम जन्मभूमी ट्रस्टला विकली तेव्हा डॉ. मिश्रा साक्षीदार क्र. २ बनले. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधी त्यांची बाजू जाणून घेण्यास उत्सुक होते. मात्र डॉ. मिश्रांनी धावतच कार गाठली.

संत नाराज, म्हणाले- आरोपांची लवकर चौकशी व्हावी:
अयोध्या हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी म्हटले की, हे प्रकरण श्रीरामांशी निगडित आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. जो कोणी दोषी आढळला त्याला सोडू नये. परंतु चौकशीअंती संजय सिंह योग्य ठरले नाही तर मी त्यांच्यावर ५० हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठाेकेन. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, या आरोपांची चौकशी लवकर होऊन वास्तव लोकांसमोर यावे.

ट्रस्टचे महासचिव चंपत राय काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, “अशा प्रकारच्या आरोपांना आपण घाबरत नाहीत. मी काही बोलणार नाही. आपल्यावर झालेल्या आरोपांचा अभ्यास करू. माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले, “आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन,” असं राय यांनी म्हटलं आहे.

 

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Ayodhya Ram Mandir Land Scam Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Ayodhya news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x