6 May 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील | नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

Nana Patole

मुंबई, १४ जून | महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पडद्याआड सुरू असलेली चर्चा आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची भूमिका घेतली तर काँग्रेस योग्य भूमिका घेईल, असं महत्त्वाची विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच पाच वर्ष राहणार असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.

संजय राऊत यांनी सांगितले आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहणार आहे. आमच्यात सर्व चर्चा झाली होती. त्यामुळे आमचं संजय राऊत भूमिका समर्थन आहे, पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल. जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवं असेल तर त्यावेळेस काँग्रेस पक्ष भूमिका घेईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी, येत्या काळातील निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केलं. नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसंच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं म्हणाले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता यासर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं.

नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो’ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे जाहला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Uddhav Thackeray will remain as Chief Minister for 5 years said congress state president Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#Nana Patekar(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x