6 May 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

7-12 Utara Updates | गाव-खेड्यात तुमची कौटुंबिक जमीन आहे? राज्य शासनाने 7/12 उताऱ्यात ‘हे’ 11 बदल केले, जागृत रहा अन्यथा..

Satbara Utara

7-12 Utara Updates | राज्य सरकारने महसूल विभागाच्या सुधारीत 7/12 उताऱ्यात असणारे जवळपास 11 नवीन बदल करण्यात आले आहे. तर यासंदर्भातला शासन निर्णय पत्रक 2 सप्टेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. हा बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जमीन अधिनियम कायद्यानुसार तलाठी दप्तराचे 21 प्रकारचे नमुने असतात. यामध्ये 2 प्रकार आहेत, ते म्हणजे कलम 7 आणि कलम 12 असे असतात.

तसेच पहिला प्रकार कलम 7 मध्ये मालकी हक्क, गट क्रमांक, एकूण किती क्षेत्र आहे असे नमूद केलेलं असत. यासोबत अन्य हक्क, शेताचे नाव, भोगवटदाराचे नाव, कुळ असेल तर त्याचे नाव, लागवडीखालील क्षेत्र, पोटखराबी, जिरायती-बागायती, असे उल्लेख त्यात असतात. कलम 12 मध्ये (गाव नमुना) यामध्ये जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते. यालाच पीक पाणी असे ग्रामीण भागात बोलले जाते.

तसेच शेतकऱ्यांना महत्वपूर्ण 7/12 जनतेला उपलब्ध करून देण्याच्या हेतुने 7/12 उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नव्या 7/12 च्या माध्यमातून अधिक माहितीपूर्ण 7/12 जनतेला उपलब्ध झाल्याने आणि महसूल विभागाच्या कामकाजात अडथळे दूर झाल्याने अचूकता आणि गतिमानता आली आहे.

काय बदल केले आहे?
1. गाव नमुना ७ मध्ये गावाचे नाव याचबरोबर गावाचा कोड टाकण्यात आला आहे.

2. एखाद्या शेतकऱ्यांचे लागवडीखालील क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्र दाखवून त्यांची बेरीज करून एकूण क्षेत्र नोंदवण्यात आले आहे.

3. शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात आले आहे.

4. यापुर्वी शेतकऱ्यांचे खाते नंबर हे इतर हक्कात नोंद केले जायचे. आताच्या नवीन नियमानुसार खातेदाराच्या नावासमोर मांडण्यात आली आहे.

5. खातेदार मयत झाल्यावर त्यास कंस देत वारसाचे नाव चढवले जायचे. याचबरोबर कर्जाचे बोजे ही त्या खातेदाराच्या नावासमोर कंसात दिले जायचे. नवीन बदलानुसार मयत खातेदाराच्या नावावर कंस करत आडवी रेष मारून नावाचा उल्लेख नष्ट करण्यात आली आहे.

6. जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात आली आहे.

7. गाव नमुना-7 मध्ये याआधी सर्व जुने फेरफार क्रमांक बदलण्यात आले आहेत ते सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात आली आहे.

8. गट नंबर एकच असेल आणि 2 खातेदार असतील तर खातेदारांची सलग नावे असायची त्यामुळे नावांचा घोळ होत होता तो दूर करून नव्या नियमानुसार 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात आली आहे. यावरून खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसतील.

9. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार नंबर आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि तारीख या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आली आहे.

10. बिगरशेतीच्या 7/12 उताऱ्यावरील शेतजमिनीचे एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळले आहेत.

11.- बिगरशेतीच्या 7/12 उताऱ्यात सर्वात शेवटी सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12 ची गरज नाही, अशा सूचना देण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  Maharashtra government has made these important 11 changes in Satbara Utara check details on 14 May 2023.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x