7 May 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
x

Vastu Shastra | घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात | प्रथम हे करा...

Vastu Shasta

मुंबई, २८ जून | वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनातील कित्येक समस्यांवर उपाय सांगितले गेले आहेत.मग ती समस्या नोकरीशी संबंधित असो, कुटुंबाशी किंवा पैश्यांशी. आज या लेखात आम्ही तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचे काही उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आर्थिक समस्या मिटवण्यासाठी आरसा कसा ठरेल उपयोगी..

वास्तुशास्त्रानुसार, वास्तु दोषांमुळे बर्‍याच वेळा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक संकटाचे मुख्य कारण आहेत, जे जाणून घ्या आणि या गोष्टी आज घराबाहेर करा,

* झाडू:
झाडू नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवला पाहिजे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून, झाडू नेहमी सोफा किंवा बेडच्या खाली ठेवा. याशिवाय झाडू कधीही उभा ठेवू नये. वास्तुनुसार नेहमीच आतून बाहेरपर्यंत झाडू लावा. कधीही बाहेरुन आत झाडू लावू नये, यामुळे घरात दारिद्र्य येते.

* घरात खराब झालेलं सामान ठेवू नका:
वास्तुनुसार, खराब घड्याळ, तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेली मातीची भांडी, तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू घरात ठेवू नका. या गोष्टी ग्रहांची वाईट स्थिती दर्शवितात. या गोष्टी ताबडतोब घराबाहेर फेकून द्या.

* कबूतराचे घरटे:
वास्तुनुसार, घरात कबूतराचे येणे, अंडी घालणे किंवा फुटणे, या सर्वामुळे होणारी घाण ही तुमच्या आर्थिक संकटात अडथळा आहे. ते बुध ग्रह दर्शवितात. काही लोक पक्ष्यांच्या घराच्या छतावर बाजरी इत्यादी ठेवतात. आपण पक्ष्यांना घराच्या आत न देता बाहेर दिले पाहिजे. आर्थिक अडचणींसाठी कबूतरांचे घरी येणे चांगले नाही.

* काटेरी झाडे लावू नका:
वास्तुनुसार, काटेरी किंवा दूध देणारी झाडे घरात लावू नये. ही झाडे वाईट वास्तुचे राहू आणि शनि यांचे प्रतिनिधित्व करतात. ही झाडे तुळशी किंवा इतर झाडांसह लावू नका. यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात.

* घरात ओलसरपणा:
वास्तुच्या मते, घरात ओलसरपणा म्हणजे शनि आणि राहूचं खराब कॉम्बिनेशन चंद्रावर भारी पडते. मान्यता आहे की जेव्हा घरात ओलसरपणा येतो तेव्हा पैशांत घट देखील होते. याव्यतिरिक्त, त्वचेच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो.

* घराच्या पायर्‍याखाली स्वयंपाकघर बनवू नका:
वास्तुनुसार स्वयंपाकघर हे घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. घर बांधताना कधीही पायऱ्यांखाली स्वयंपाकघर किंवा शौचालय बनवू नका. याशिवाय, पायर्‍यांखाली शूज आणि चप्पल ठेवू नका. वास्तुनुसार, पायऱ्यांमुळे आयुष्यात उंची वाढते. म्हणून या गोष्टी टाळाव्या.

* वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पैश्यांशी संबंधित समस्या निर्माण झाल्या असतील तर घरातील डायनिंग टेबलसमोर आरसा लावावा. परंतु डायनिंग टेबलसमोर आरसा लावताना ही काळजी घ्या की त्या आरश्यात संपूर्ण टेबल दिसायला हवा. असे म्हटले जाते की, असे केल्यास आयुष्यात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही.

* वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या आयुष्यात पैश्यांशी संबंधित काही अडचणी असतील तर आरश्याशी संबंधित आणखी एक उपाय आपण आजमावू शकतो. त्यासाठी बेडरूमच्या दरवाज्याच्या अगदी समोरच आरसा लावावा. असे केल्यास घरामध्ये सुरू असणाऱ्या पैश्यांशी संबंधित अडचणी हळूहळू नाहीश्या होऊ लागतील.

* वास्तुशास्त्रानुसार पैश्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा. असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैश्यांशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच अचानक धनलाभाची संधीही मिळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Vastu Shasta do not keep these things in your house will cause financial problems news updates.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x