2 May 2024 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

शिवसेनेचे लग्न आमच्यासोबत झाले | आम्ही मंगळसूत्र घातल्यानंतर अचानक नवरी पळून गेली - आ. सुरेश धस

BJP MLA Suresh Dhas

बीड, २९ जून | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार हे मनाला येईल ते बोलत आहेत. राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. वडेट्टीवार फडतूस असून त्यांनी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवावे. पोलिस बंदोबस्तातच त्यांचा सत्कार केला नाही तर सुरेश धस नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात साेमवारी सकाळी काढलेल्या विराट मोर्चाची वेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर विराट मोर्चाला सुरुवात झाली.

शहरातील माळीवेस, धोंडीपुरा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोडमार्गे हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यांनतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. नगर रोडवर दुतर्फी हजारो मोर्चेकरी लोटले होते. आमदार धस म्हणाले की, नाना पटोले जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेतात, राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा निघते तेव्हा काेराेना हाेत नाही का? अधिवेशन घ्यायच्या वेळी मात्र आठ दिवसांऐवजी २ दिवसांत ते आटोपले जाते. प्रश्न मांडायचे कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोर्चाच्या व्यासपीठावर भाजपचे गेवराई आमदार अॅड. लक्ष्मण पवार, माजी आमदार आर. टी. देशमुख, जि.प. माजी अध्यक्षा मीराताई गांधले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, गंगाधर काळकुटे, संभाजी सुर्वे, स्वाभिमानी संघटनेचे प्रा. सचिन उबाळे, ऊसतोड कामगार संघटनेचे सुग्रीव सानप, अभिजित शेंडगे, गणेश उगले, अॅड.प्रकाश कवठेकर, माउली जरांगे, मनसेचे अशोक तावरे आदी उपस्थित होते.

मंगळसूत्र घातले, नवरी पळून गेली:
राज्यातील जनतेने शिवसेनेला निवडून दिले. शिवसेनेचे लग्न आमच्या बरोबर झाले. आम्ही मंगळसूत्र घातले तेव्हा अचानक नवरी पळून गेली. आमदार धस म्हणाले की, फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हायकोर्टात टिकले. मात्र राज्य सरकारला ते सुप्रीम कोर्टात टिकवता आले नाही. आरक्षण रद्द झाले तेव्हा जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: BJP MLA Suresh Dhas statement against Shivsena over forming MahaVikas Aghadi news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x