5 May 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं | या समस्या होतात दूर

Drinking cumin and jaggery water is beneficial

मुंबई, १३ जुलै | घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

* गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर हा उपाय जरुर करुन पाहा. डोकेदुखीशिवाय ताप असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.

* जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.

* जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या प्रत्येक समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज जिरे आणि गुळाचे पाणी घ्या.

* पाठदुखी अथवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर यावरही जिरे आणि गुळाचे पाणी फायदेशीर असते. याशिवाय पिरियड्सदरम्यान हार्मोन्स बदलामुळे महिलांना त्रास होतो. यावरही गुळ आणि जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

* हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जिरे आणि गुळाचे सेवन केल्यानं हाडांची मजबुती वाढण्यास मदत होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार या दोन्ही पदार्थांमध्ये हाडांसाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळले आहेत. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी जिरे आणि गुळाचे सेवन आरोग्यदायी असतं.

* स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांवरही गुळ आणि जिरे फायदेशीर ठरतात. गुळाच्या पाण्यात जिरे टाकून प्यायल्याने मासिक पाळीच्या काळातील तक्रारी दूर होतात. जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तर गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Drinking cumin and jaggery water is beneficial for health in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x