29 April 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Health First | शरीरावरील जखमांचे व्रण कमी करणारे हे घरगुती उपाय माहित आहेत? - नक्की वाचा

Home remedies to get rid of burn skin scars

मुंबई, १३ जुलै | संसार, घरकाम आले की लहान सहान जखमा, अपघात होणारच. पण त्याचे व्रण दीर्घकाळ राहिल्यास त्या त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा मनात येतात. म्हणूनच नो मार्स्कच्या तज्ज्ञांनी सुचवलेल्या या पारंपारिक औषधोपचारांनी त्या जखमांचे व्रणतुम्ही काही घरगुती उपायांनीच दूर करू शकता.

शरीरावरील जखमांचे व्रण कमी करणारे हे घरगुती उपाय माहित आहेत? – Home remedies to get rid of burn skin scars in Marathi :

1) लिंबू व टोमॅटोचा रस:
या रसाच्या मिश्रणामुळे त्वचेवरील मृत त्वचा जाण्यास तसेच त्वचेला नवा उजाळा येण्यास मदत होते. लिंबातील अ‍ॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग हलके करतात.तर ताज्या टोमॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.

मग कसा वापराल हा रस ?
* जखम साध्या पाण्याने धुवा.
* जखमेवर काही तास ओला वॉश क्लोथ ठेवा.
* काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा.
* त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता.

असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल:

How to Get Rid of Old Scars Top 8 Remedies :

2) बदामाचे तेल:
बदामाचे तेल जखमेवर लावल्यास तुम्हांला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

3) मेथीचे दाणे:
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा.
* तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
* मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच त्याचे व्रण दूर होण्यास मदत होते.

4) लव्हेंडर ऑईल:
हे तेल दाहशामक असल्याने तसेच जखम भरून काढण्यास मदत करतात.
* जखम झाल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही लव्हेंडर ऑईल लावाल तेवढी व्रण पडण्याची शक्यता कमी होते.
* जखम खूपच मोठी असल्यास, कापडाच्या बोळ्यावर तेल घालून ते काही ठराविक तासाने पुन्हा लावा.

5) इंडियन युनानी कॉटन अ‍ॅश पेस्ट:
हा एक रेडीमेड उपाय आहे.
* कॉटन वूल / सुती कपडा जाळा.
* त्याची राख ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून पेस्ट तयार करा.
* ही पेस्ट जखमेवर लावून त्यावर क्लिंग फिल्म लावा. यामुळे वेदना तत्काळ कमी होण्यास मदत होते.

6) बटाट्याची साल:
हा एक प्राचीन आणि फायदेशीर घरगुती उपाय आहे. यातील दाहशामक गुणधर्मामुळे तसेच अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
* बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावा.
* तुम्ही झटपट आराम मिळवण्यासाठी ही साल बॅन्डेज म्हणून बांधून ठेवू शकता.

7) बार्ली, हळद आणि दही:
बार्ली, हळद आणि दही हे मिश्रण एक उत्तम घरगुती उपाय आहे.
* बार्ली, हळद आणि दही समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा.
* तयार मिश्रण हलक्या हाताने जखमेवर लावावे.

8) कलॉइडल सिल्वर:
कलॉइडल सिल्वर हे अ‍ॅन्टीसेप्टिक असल्याने त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत करतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedies to get rid of burn skin scars in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x