6 May 2024 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात | हरीश चौधरींचे मोठे विधान

Prashant Kishor

नवी दिल्ली, १६ जुलै | राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या दिवशी राजस्थानचे महसूल मंत्री हरीश चौधरी दिल्लीमध्ये होते. त्यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. येत्या काळात प्रशांत किशोर महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात, असे संकेत हरीश चौधरी यांनी दिले आहेत.

हरीश चौधरी म्हणाले, की पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांची भेट घेण्याचा अर्थ प्रशांत किशोर हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. येत्या काळात प्रशांत किशोर हे काँग्रेसशी हातमिळवणी करू शकतात, असे संकेत आहेत

राहुल गांधी यांच्या सूचनेप्रमाणे महसूल मंत्री हरीश चौधरी हे दिल्लीत गेले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंह यांच्या वादाबाबत महसूल मंत्री हरीश चौधरी यांनी राहुल यांची भेट घेतली होती. हरीश चौधरी हे पंजाब राज्याचे 7 वर्षे काँग्रेसचे प्रभारी होते

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rajasthan revenue minister Harish Chaudhary big statement on Prashant Kishor news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x