3 May 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

जळगाव | भाजप आ. सुरेश भोळेंच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे बॅनर फाडले

Shivsena

जळगाव, ०४ ऑगस्ट | जळगाव शहरातील SBI कॉलनीत आ.सुरेश भोळे यांनी पाहणी दौरा केल्यानंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामासंबंधी लावलेले विकासाचे बॅनर फाडून फेकल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. बॅनर फाडणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याने या कार्यकर्त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी दिली आहे.

SBI कॉलनीत सोमवारी सकाळी आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यासोबत अचानक पाहणी दौरा केला. दौरा आटोपतच दुपारी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवक नितीन बरडे व बंटी जोशी यांनी परिसरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाबाबत ठिकठिकाणी लावलेले विकासकामांचे बॅनर फाडून फेकले.

आम्हाला CCTV फुटेजमध्ये बॅनर फाडणारा कैद झाला असून तो कोण आहे ते समजले आहे. याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे नितीन बरडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शिवसेना नगरसेवक चांगलेच संतप्त झाले आहेत. बॅनर फाडणे भारतीय जनता पक्षाची संस्कृती नसून मी या प्रकाराचा निषेध करतो. बॅनर फाडणाऱ्यावर कारवाई करावी, असे आ.सुरेश भोळे यांनी सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: The banner of Jalgaon Shivsena corporators was torn down news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x