2 May 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

मंत्री असतानाही राम शिंदेंना जमलं नाही ते आ. रोहित पवारांनी केलं | कर्जत-जामखेड बस स्थानक, व्यापारी संकुलाचे भूमीपूजन

MLA Rohit Pawar

नगर, ०४ ऑगस्ट | कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारले जात आहे. त्याचसोबत नागरिकांच्या सोईसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत. मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची मीमांसा केली जाते. मागील सरकारच्या काळात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आश्वासने दिली होती.

मोठ्या घोषणा केल्या होत्या, मात्र आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात, त्यातही ५ वर्ष मंत्रीपद असतानाही जामखेडच्या प्रलंबित बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले. आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात आपल्या कार्यकर्तृत्वाचा नवा पायंडा स्थापित करून विकासकामांचा धडाका लावला आहे.

आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासाच्या निर्णायक कृतिकार्यक्रमांमुळे मतदारसंघातील नागरिकांना नवी दृष्टी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी लोकांच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून राजकीय इच्छाशक्ती आणि कृतीशील आचरणातून राज्यभरातील लोकप्रतिनिधींसमोर नवा आदर्श स्थापित करण्याचे काम केले आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने जामखेड शहरातील बस स्थानक कात टाकत आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जुन्या बस स्थानकाच्या जागी दहा प्लॅटफॉर्म असलेले भव्य असे सर्वसुविधा संपन्न बस स्थानक उभारले जाणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Karjat Jamkhed New bus depo and business park development by NCP MLA Rohit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x