12 May 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

गुजरातच्या स्टेडियमला स्वतःच नाव देणाऱ्या मोदींनी खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचं नाव हटवलं

Major Dhyan Chand Khel Ratna award

नवी दिल्ली, ०६ ऑगस्ट | केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

मोदी काय म्हणाले?
भारतभरातील नागरिकांकडून मला खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करत, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे. जय हिंद! मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते ज्यांनी भारताचा सन्मान वाढविला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावर ठेवला जाणे योग्य आहे”, असे ट्विट मोदी यांनी केले.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाने आम्ही सर्व जण प्रभावित आहोत. विशेषत: हॉकी संघातील आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली, जिंकण्याच्या प्रती ती जिद्द दाखवली ती वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. देशाला अभिमानास्पद बनवलेल्या क्षणांमध्ये, अनेक देशवासियांची विनंती देखील समोर आली आहे, की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जावे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे, असे मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rajiv Gandhi Khel Ratna now major Dhyan Chand award says PM Narendra Modi  news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x