21 May 2024 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल | प्रकृती स्थिर

Eknath Khadse

मुंबई ०८ ऑगस्ट | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

‘एमआयडीसी’तील भूखंड खरेदी प्रकरणामध्ये नेमलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान पाच वर्षांपूर्वी भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंवर आरोप झाले होते. यानंतर खडसे यांना 4 जून 2016 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी 23 जून 2016 रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज तीन मे 2017 पर्यंत सुरू होते. त्यानंतर 30 जून रोजी समितीने सरकारला अहवाल सादर केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Eknath Khadse has been admitted to a Bombay Hospital news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x