1 May 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मुंबई आणि कुडाळमध्ये पराभूत झालेल्या नारायण राणेंवर मुंबई महापालिका निवडणुकीची जवाबदारी? | भाजपचं मिशन 114

Mumbai Municipal Corporation 2022

मुंबई, १६ ऑगस्ट | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणताही चेहरा नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण गुजराती, मारवाडी आणि जैन या पारंपरिक मतदारांपलीकडे मुंबईतील शिवसेनेचा मतदार असलेल्या मराठी, भंडारी ते मालवणी मतदारांपुढे कोणता चेहराच नाही हे स्पष्ट झालं आहे. तसेच फडणवीसांना मुंबईत तास कोणीही चाहता वर्ग नाही. तसेच मुंबईतील भाजपचे बरेच विद्यमान आमदार हे मोदी लाटेवर निवडून आले आहेत आणि ते देखील ट्विटरवर वारंवार ट्विट करत स्वतःच्या बातम्या कशा झळकतील यावर केंद्रित असल्याने जमिनीवर त्यांची कोणतीही ओळख झालेली नाही. परिणामी मुंबई आणि कुडाळमध्ये पराभूत झालेले विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुढे करण्याशिवाय भाजपाकडे कोणताही पर्याय नसल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या चारही नेत्यांची भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा या हेतूने ही यात्रा काढल्याचं सांगितलं जातं. मात्र, या यात्रेच्या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचं उघड झालं आहे. भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन 114’ सोपवल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्या दिवशी राणे सकाळी 10 वाजता विमानतळावर पोहोचतील. तिथूनच त्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. मुंबई आणि कोकण पट्ट्यात ही यात्रा राहणार आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Municipal Corporation 2022 Union Minister Narayan Rane may get responsibility from BJP news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x