29 April 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

VIDEO | कर्नाटक भाजपची तालिबान स्टाईल जन आशीर्वाद यात्रा | रायफल्सला पक्षाचा झेंडे अन गोळीबार

Jan Ashirwad Yatra

यादगीर, १९ ऑगस्ट | मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी बांद्रा इथे काही स्वागत समारंभात भाग घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात स्व. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देत त्यांना नमन केलं. असं असलं तरी मोदी सरकारने नेमकी काय विकास कामं केली आणि त्याचा सामान्यांना कसा फायदा झाला ते सांगणं सोडून ठाकरे सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे.

कर्नाटकात जण आशीर्वाद यात्रेला तालिबानी स्वरूप (Karnataka BJP Workers fire shots in the air to welcome MoS Bhagwant Khuba in Yadgi for Jan Ashirwad Yatra) :

दुसऱ्या बाजूला कर्नाटकात देखील नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासोबत जण आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र त्या नेमक्या जण आशीर्वाद की दहशत यात्रा आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण तिथे आता जण आशीर्वाद यात्रेला तालिबानी स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय.

कर्नाटकातील यादगीरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांचे स्वागत करण्यासाठी कर्नाटक मधील स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क देशी बनावटीच्या रायफल्सला पक्षाचा झेंडा बांधून हवेत गोळीबार केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत किमान 4 जणांना अटक करण्यात आली आहे आणि रायफल्सच्या परवान्याची पडताळणी केली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री खुबा हे यादगीरमध्ये जनआशिर्वादयात्रेसाठी होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Karnataka BJP Workers fire shots in the air to welcome MoS Bhagwant Khuba in Yadgi for Jan Ashirwad Yatra.

हॅशटॅग्स

#JanAshirwadYatra(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x