3 May 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८: बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पांघलची सुवर्ण कमाई

जकार्ता : जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या अमित पांघलने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

अमित पांघलने अंतिम फेरीत बाजी मारत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवला मात देत भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारी तसेच अनुभवाने हसनबॉय हा अमित पांघल पेक्षा अनेक पटीने उजवा खेळाडू होता, तरीही अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला आश्चर्यचकीत करुन टाकलं आणि देशासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे.

दरम्यान, काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमितने फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर विजय प्राप्त केला होता. त्याआधी भारताच्या विकास क्रिशनला उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे अमित पांघल’कडून भारताच्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि भारतीयांच्या त्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x