26 April 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

Neck Pain | तुम्हालाही मान दुखण्याचा त्रास आहे? | ही आहेत कारणे आणि उपचार | नक्की वाचा

Home remedies on neck pain

Neck Pain | मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.

कोणत्याही कारणांमुळे आपली मान दुखू शकते:
* दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये काम करणे
* उशीचा चुकीच्या रितीने होणारा वापर
* अनेक तास एकाच बाजूने मान झुकवणे
* खराब पोझिशनमध्ये बसणे
* संगणकाचे मॉनिटर खूप कमी किंवा अधिक उंचीवर असणे
* व्यायाम करताना मान योग्य रितीने न वळवणे
* दुचाकी वाहनांवरुन अधिक प्रवास करणे या कारणांमुळे मान दुखते.

आपणही मानेच्या दुखण्याने त्रस्त असाल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी घरगुती उपचार देखील करु शकतात.

मानदुखीवरचे उपचार:
1. मानेवर बर्फ फिरवाः मानेचे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळण्यासाठी दिवसातून अनेकदा पाच मिनिटांपर्यंत बर्फ मानेवर फिरवा. एवढेच नाही मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा. दुखणार्या जागी हिटिंग पॅडचा वापर करा. नक्कीच आराम मिळेल.
2. मानेवर मसाज करा महानारायण तेलासारख्या वेदनाशामक तेलाने मानेचा मसाज करा. आपली मान आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळेल. दुखणे कमी होईल.
3. सैंधव मीठाचा वापरः मानदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ हे औषधाप्रमाणे काम करते. त्याचा उपयोग स्नायूचे दुखणे आणि सूज कमी करण्यासाठी करता येतो. त्याच्या वापराने मानदुखीपासून आराम मिळेल. एका बाथटबमध्ये कोमट पाण्यात सैंधव मीठ टाका. या पाण्यात मानेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे बसा. आपल्याला आराम पडेल.

याकडे लक्ष द्या:
* काम करताना टेबल आणि खूर्चीचा वापर करा. बेडवर बसून काम करण्याचे टाळा
* लॅपटॉप आणि डोळे याची पातळी 90 अंश असणे गरजेचे आहे.
* दीर्घकाळापर्यंत काम करण्यासाठी लॅपटॉपऐवजी डॅशबोर्डचा वापर करावा.
* दर चाळीस मिनिटानंतर वॉक करा.
* रात्री झोपण्यासाठी पातळ आणि हलकी उशी वापरा.
* मानदुखीवर ऍक्युप्रेशर, स्युझोक थेरपीचाही चांगला उपयोग होतो. तथापि, हे सर्व उपचार तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Health Title: Neck Pain home remedies in Marathi check details 23 June 2022.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x