27 April 2024 11:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Maharashtra Schools Reopen | शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता | या तारखेपासून शाळा सुरु

School Reopen

मुंबई, २४ सप्टेंबर | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

Maharashtra Schools Reopen, शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता, या तारखेपासून शाळा सुरु – Maharashtra CM Uddhav Thackeray approve proposal of reopening schools :

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

कुठले वर्ग सुरु होणार?
जुलै महिन्यात शासन आदेश काढून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर 5 वी ते 8 च्या शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञ यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. टास्क फोर्सनं शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा करायची यासंदर्भात माहिती दिली आहे. पालकांची संमती असणं गरजेचं आहे. फिजिकल डिस्टन्सिगं याचं पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही 4 ऑक्टोबरला शाळा सुरु करत आहोत, अशी माहिती देणार आहे.

टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra CM Uddhav Thackeray approve proposal of reopening schools.

हॅशटॅग्स

#School(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x