26 April 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

MP Varun Gandhi Leaving BJP? | खा. वरुण गांधी भाजप सोडणार? | ट्विटरवरून भाजपचं नाव हटवलं

MP Varun Gandhi Leaving BJP

लखनऊ, ०४ ऑक्टोबर | योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले (MP Varun Gandhi Leaving BJP) जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी. म्हणूनच ते भाजपवर नाराज असल्यानेच त्यांनी अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.

MP Varun Gandhi Leaving BJP. BJP MP Varun Gandhi has removed the BJP’s name from his Twitter account. He is now being surprised by the deletion of BJP’s name directly from his Twitter account :

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव काढून टाकलं आहे. वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर थेट हल्ला करत आहेत. त्यानंत त्यांनी आता थेट ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून वरुण गांधी भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. लखीमपुरा हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयपणे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MP Varun Gandhi Leaving BJP after Lakhimpur kheri violence.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x